Verification: 4e7838d05962b884

IPL 2023 : Arjun Tendulkar अर्जुनच्या पदार्पणाची शक्यता !

Spread the love

IPL 2023 cricket : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा Sachin Tendulkar मुलगा अर्जुन तेंडुलकर Arjun Tendulkar खूप मेहनत घेत आहे, मात्र तरीही त्याला मोठ्या मंचावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नाहीये. अर्जुन गेल्या 2 वर्षांपासून आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे, परंतु त्याला अद्याप पदार्पण करता आलेले नाही. MI ने त्याला प्रथम IPL 2021 मध्ये 20 लाखांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात समाविष्ट केले, तर 2022 मध्ये त्यांनी अर्जुनला 30 लाखांना विकत घेतले. मुंबईच्या ( Mumbai ) कर्णधाराला अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) पदार्पणाबद्दल विचारले असता त्याने सडेतोड उत्तर दिले.

arjun tendulkar ipl 2023
IPL 2023 Arjun Tendulkar Sachin Tendulkar Mark Boucher rohit sharma

Mumbai Indians coach Mark Boucher

यावेळी मुंबई इंडियन्सचे ( Mumbi Indians ) प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी या विषयावर बोलताना सांगितले की अर्जुनने आपल्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे आणि जर तो तयार असेल तर निश्चितपणे निवडीसाठी त्याचा विचार केला जाईल. पुढे ते म्हणाले, मला वाटते की तो गेल्या ६ महिन्यांत खूप चांगले क्रिकेट खेळत आहे, विशेषतः गोलंदाजीच्या बाबतीत. तर होय, जर आम्ही त्याला निवडीसाठी उपलब्ध करू शकलो तर ते आमच्यासाठी खूप चांगले होईल.

गेल्या रणजी मोसमात त्याने गोव्यासाठी पदार्पणातच शतक झळकावले. याशिवाय गोलंदाजीतही तो चमकला होता. वाऊचर म्हणाला, अर्जुन गेल्या काही काळापासून चांगली गोलंदाजी करत आहे. आम्हाला वाटते तो यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेईंग ११ मध्ये असेल. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ ७ प्रथम श्रेणी, ७ लिस्ट ए आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत.

Special preparation of Mumbai Indians before IPL 2023

या स्पर्धेदरम्यान रोहितला Rohit Sharma काही सामन्यांसाठी विश्रांती देण्याची शक्यताही बाउचरने बोलून दाखवली. आयपीएलनंतर लगेचच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे आणि या वर्षी आशिया कप आणि वर्ल्ड कपसारख्या स्पर्धाही खेळायच्या आहेत.

Mark Baucher MI –

बाउचर म्हणाला, ‘जोपर्यंत रोहितला विश्रांती देण्याचा प्रश्न आहे, तो कर्णधार आहे. आशा आहे की तो काही प्रकारच्या फॉर्ममध्ये येईल आणि आशा आहे की त्याला विश्रांती घेण्याची इच्छा नाही, परंतु परिस्थिती काहीही असो, आम्ही त्याच्याशी जुळवून घेऊ.

IPL 2023 Arjun Tendulkar Sachin Tendulkar Mark Boucher rohit sharma