Verification: 4e7838d05962b884

Sri Lanka : औषधांच्या किंमतीत 4 पट वाढ

Spread the love

श्रीलंकेत सध्या अर्थिक संकट आले आहे. टंचाईमुळे औषधांच्या किंमतीतसुध्दा 4 पट वाढ झाली आहे. अशी माहिती सरकारी आरोग्य सेवकांच्या संघटनेकडून देण्यात आली आहे. ( Sri Lanka Economic Crisis )

सध्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे. औषधं आणि वैद्यकिय उपकरण मिळणे कठीण झाले आहे. स्थानिक बाजारात काही औषधं उपलब्ध नाहीत. त्याच्या किंमतीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचं या संघटनेचे प्रवक्ते डॉ. प्रसाद कोलाबागे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अनेक औषधांची आणि वैद्यकिय उपकरणांची आयात बंद केली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक अहवालामध्ये सांगण्यात आले.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 10
Sri Lanka Economic Crisis