Verification: 4e7838d05962b884

भारत व नागालँड एक वर्षीय युद्धबंदी करार | India and Nagaland sign a one-year ceasefire agreement

Spread the love

भारत सरकारचा ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड – के’ साेबत करार

सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड
नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड

नागा शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभुमीवर भारत सरकारने‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड – के’ म्हणजेच ‘निकी’ यांच्या सोबत एका वर्षासाठी युद्धबंदी करार केला आहे.

दरम्यान, यामध्ये निकीचे एकुण 200 हून अधिक कार्यकर्ते शस्त्रास्त्रांसह सहभागी झाले आहेत. दि. 08 रोजी या युद्धबंदी करार व युद्धबंदी मान्यतेच्या नियमांवर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्राकडुन याआधीच NLCN-IM, NSCN-IM,NSCN-K-KHANGO या अन्य नागा गटांशी युद्धबंदीचा करार केला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने NLFT-SD सोबतच्या करारानंतर 88 कार्यकर्ते शस्त्रास्त्रांसह त्रिपुराच्या मुख्य सामाजिक प्रवाहात सामील झाले आहेत. शिवाय जानेवारी 2020 मध्ये बोडो करारावर स्वाक्षरी केल्यावर, एनडी एफबीच्या सर्व गटांसह बंडखोर गटाच्या 2,250 हून अधिक कार्यकर्त्यांनी, आपल्या 423 शस्त्रं आणि मोठ्या दारुगोळा साठ्यासह आसाममध्ये आत्मसमर्पण केलं आणि ते मुख्य प्रवाहात सामील झाले. 2021 फेब्रुवारीमध्ये, आसामच्या विविध भूमिगत कार्बी गटांचे 1040 नेते आणि कार्यकर्त्यांनी 338 शस्त्रांसहीत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात कार्बी आंग्लॉन्ग करारावर स्वाक्षरी झाली आहे.

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *