Verification: 4e7838d05962b884

शहीद चंद्रशेखर आझाद ( Chandrasekhar Azad ) यांचा मध्य प्रदेशात भव्य पुतळा बसवण्यात येणार

Spread the love

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद ( Chandrasekhar Azad ) यांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. आझाद यांचे जन्मस्थान भाबरा येथून आणलेली माती पुतळ्याच्या पायाभरणीसाठी वापरली जाणार आहे. युवकांसाठी प्रेरणास्रोत म्हणून पुतळ्याची जागा विकसित केली जाणार आहे.

अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त भोपाळ येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय युवा महापंचायतीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, येत्या 25 वर्षात देशाचा विश्वगुरूच्या पातळीवर विकास करून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले.

यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील युवकांच्या सूचनांचा समावेश करून नवीन युवा धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली, ज्याची अंमलबजावणी 12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंतीपासून करण्यात येणार आहे.

NPIC 202272320202
Chandrasekhar Azad