Verification: 4e7838d05962b884

विधवा प्रथा ( widow ) बंद ; सिंधुदुर्ग जिल्ह्याची आघाडी

Spread the love

अनिष्ट विधवा ( widow ) प्रथा बंद करण्याची मोहिम राभविण्यात येत आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातल्यातील 431 पैकी 319 ग्रामपंचायतींनी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घेतले आहेत. तसेच इतर ग्रामपंचायतींनीसुध्दा ठराव घेतल्यास ही प्रथा बंद करण्याचे ठराव घेणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील 1 ला जिल्हा ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड या ग्रामपंचायतीने अनिष्ट विधवा प्रथा बंदचा करण्याचा ठराव घेतला होता. राज्य सरकारने त्याची दखल घेऊन अनिष्ट प्रथा बंद करण्याचा शासन निर्णय घेतला.

दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर यांनी विधवा प्रथा बंद करण्याची मोहीम गावागावात राबविली. त्यामुळे लवकरच उर्वरित सर्व ग्रामपंचायती ठराव घेतील आणि सिंधुदुर्ग जिल्हा या अनिष्ट प्रथा निर्मुलनात राज्यात नक्कीच आघाडी घेईल. अशी माहिती दिली. (widow practice )

Alliance of Sindhudurg district against widow practice
Alliance of Sindhudurg district against widow practice