Verification: 4e7838d05962b884

काय असणार सर्वसामान्य नागरिकांसाठी ध्वज संहिता ? Har Ghar Tiranga

Spread the love

सरकारने देशाच्या ध्वज संहितेत सुधारणा केली आहे. त्‍यानुसार मोकळ्या जागा आणि घरावर रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत मोकळ्या जागेत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावण्यास मान्यता होती. यापुढे कुठलाही भारतीय नागरिक राष्ट्रध्वजाचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी तिरंगा फडकवू शकतो. ( Indian Flag )

हा निर्णय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन सर्व नागरिकांना केलं आहे. हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे राष्ट्रध्वजासोबत आपलं नातं अधिक दृढ होईल, असंही ते यावेळी म्हणाले. ( Har Ghar Tiranga )

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 12 1
Har Ghar Tiranga