Verification: 4e7838d05962b884

फिफा राष्ट्र करंडक ( FIFA National Cup ) स्पर्धा 2022 साठी भारत पात्र

Spread the love

फिफा राष्ट्र करंडक स्पर्धा २०२२ ( FIFA National Cup 2022 )साठी भारत पात्र ठरला आहे. डेन्मार्कमध्ये कोपनहेगन ( Denmark Kopanhegan ) इथं पुढच्या महिन्यात २६ जुलैपासून ३० जुलैपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. भारताच्या ( India ) वतीनं चरणज्योत सिंग, सिद्ध चंद्राना आणि सारांश जैन हे तीन खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

या स्पर्धेच्या नियमांनुसार पात्र ठरलेल्या देशांचे प्रतिनिधी एकमेकांविरुद्ध दोन विरुद्ध दोन या स्वरुपातल्या लढतींमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेच्या बाद फेरीत भारताचे सामने आशिया आणि ओशियानातल्या संघांसोबत होतील. इ ईए स्पोर्ट्सच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते.

फिफा राष्ट्र करंडक ( FIFA National Cup ) स्पर्धा 2022 साठी भारत पात्र
FIFA National Cup 2022