Verification: 4e7838d05962b884

७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस ( Rain ) झाल्याशिवाय पेरणी करु नये – कृषी आयुक्त धीरज कुमार

Spread the love

शेतकऱ्यांनी ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस ( Rain ) झाल्याशिवाय पेरणी करू नये, असं कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगीतले आहे. औरंगाबाद येथे औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या खरीपपूर्व आढावा बैठक झाली. त्यात त्यांनी माहिती दिली.

मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधे मृग नक्षत्राचा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी पेरणीलासुद्धा सुरुवात झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये. असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.

मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादन क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी राज्य सरकारनं हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती धीरज कुमार यांनी दिली.

NPIC 202261216742