Verification: 4e7838d05962b884

भारत ( India )आणि अमेरिका ( America )यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहन करार

Spread the love

भारत ( India )आणि अमेरिकेदरम्यान ( America )आज जपानमधल्या टोकियो इथं गुंतवणूक प्रोत्साहन करार करण्यात आला. भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा ( Vinay Katra )आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास वित्त महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट नैथन यांनी सह्या केल्या.

या करारामुळे  देशातल्या आर्थिक गुंतवणूक वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ देशात  चार अब्ज डॉलरच्या गुंतवणूक प्रस्तावावर विचार करत आहे. यामध्ये कोविड लस निर्मिती, आरोग्य सेवा, नवीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांचा समावेश आहे.

भारत ( India )आणि अमेरिका ( America )यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहन करार
भारत ( India )आणि अमेरिका ( America )यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहन करार