Verification: 4e7838d05962b884

क्वाड देशांच्या ( Quad countries ) शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री PM Modi जपानमध्ये दाखल

Spread the love

क्वाड देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Modi )आज पहाटे जपानमधल्या टोक्यो Tokyo इथं पोहोचले.

टोक्योमध्ये पोहोचल्यानंतर जपानमध्ये असलेल्या भारतीयांनी ( Indian ) प्रधानमंत्र्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. विविध भारतीय भाषांमध्ये लिहिलेले स्वागताचे फलक हातात घेऊन भारतीय मुलं प्रधानमंत्र्यांचं वास्तव्य असलेल्या जागेजवळ उभी होती.

प्रधानमंत्री PM Modi जपानमध्ये दाखल
प्रधानमंत्री PM Modi जपानमध्ये दाखल

भारतासह जपान ( Japan ), ऑस्ट्रेलिया ( Australia )आणि अमेरिका ( America )या चार देशांचा समूह क्वाड समूह म्हणून ओळखला जातो. हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता, विकास आणि सहकार्य हे क्वाड देशांच्या संघटनेचं उद्दिष्ट आहे.

आपल्या दोन दिवसांच्या भेटीमध्ये शिखर परिषदेव्यतिरिक्त मोदी जपानचे प्रधानमंत्री फ़ुमिओ किशिदा ( fumio kishida ), अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन ( Joe Biden )आणि ऑस्ट्रलियाचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री अॅन्थनी अल्बानीज ( Anthony Albanese )यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी जपानमधल्या उद्योजक – व्यवसाय प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. तसंच जपानमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांशी संवादही साधणार आहेत.

जपानमध्ये ( Japan )सुमारे ४० हजार भारतीय लोक राहतात.भारताच्या जपानबरोबरच्या संबंधांचे दूत असलेल्या या सर्वांसोबत संवाद साधण्यास आपण उत्सुक आहोत, असं प्रधानमंत्र्यांनी जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.