Verification: 4e7838d05962b884

भारत्तोलनामध्ये ( Weightlifting ) सांगलीला सुवर्ण

Spread the love

खेलो इंडिया स्पर्धेचा काल तिसरा दिवस पार पडला. यामध्ये महाराष्ट्राच्या संघाने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची कमाई केली.

योगासनात – ६ सुवर्ण पदकं
भारत्तोलनामध्ये – २ मुली आणि 1 मुलगा सुवर्ण पदक सायकलिंगमध्येही – ९ सुवर्ण पदकं जिंकली

त्याचबरोबर योगासनात १, सायकलिंग,२ आणि कुस्तीमध्ये १ अशी चार रौप्य पदकं आणि कुस्तीमध्येच दोन कास्य पदकं मुलींनी जिंकली.

सुमित भंडारे, वैदेही मयेकर, युगांका राजम, आर्यन खरात, निबोध पाटील, नानक अभंग, अंश मयेकर, स्वरा गुजर गीता शिंदे यांना योगासनात काही वैयक्तिक तर काही संयुक्त सुवर्ण पदकं मिळाली.

भारत्तोलनामध्ये ( Weightlifting ) सांगलीच्या ( Sanglai )काजल सलगरने तसंच मुकुंद आहेर आणि हर्षदा गरूड यांनीही सुवर्ण पदक पटकावलं. सायकलिंगमध्ये संज्ञा कोकाटे हिला सुवर्ण पदक मिळालं.

Sangli Gold in Weightlifting
Sangli Gold in Weightlifting