Verification: 4e7838d05962b884

हापूस आंबा समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना.!

Spread the love

जगप्रसिद्ध हापूस Hapus आंबा काल समुद्रामार्गे अमेरिकेला America रवाना झाला. याआधी हापूस आंबा विमानामार्गे अमेरिकेला रवाना केरण्यतात येत होता. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय हापूसचा Indian Hapus दर जास्त असायचा. यावर उपाय म्हणून भाभा अणू संशोधन केंद्र, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि अपेडा यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे हे शक्य झाले. हा भारतीय इतिहासातला ऐतिहासिक क्षण आहे. असे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगीतले आहे.

कृषीमालाची साठवणूक आणि निर्यातकरण्यासाठी भाभा केंद्राचं मोलाचं सहकार्य मिळाले आहे. असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे आंबा वाहतुकीचा खर्च १० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतीय हापूसचा दर स्पर्धात्मक असेल, असंही पवार म्हणाले.

NPIC 202265195613
Hapus