Verification: 4e7838d05962b884

Shivsena : पक्ष आणि निशानी बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Spread the love

शिवसेना ( Shivsena ) आणि धनुष्यबाण ( Dhanushyaban ) यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा केला होता. त्याबदृल सर्वोच्च न्यायालयात येत्या 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचं, याचे येत्या 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दरम्यान ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेऊन, अशाप्रकारे कागदपत्रांची मागणी हा न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत असल्याचं सांगीतले आहे. त्यावर न्यायालयानं १ ऑगस्टला अन्य प्रकरणांवरच्या सुनावणींसोबत या विषयावरही सुनावणी घ्यायला अनुकूलता दर्शवली आहे.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 15 2
Shivsena: Supreme Court Hearing on Party and Nishani