Verification: 4e7838d05962b884

10 th Result : शुक्रवारी दुपारी ऑनलाइन ( Online ) जाहीर होणार

Spread the love

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( 10 th Result ) परीक्षेचा निकाल उद्या 17 June 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsh Gaikwad ) यांनी ही माहिती दिली.

हे निकाल www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, या संकेतस्थळांवर पाहता येतील.या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, तसंच या माहितीची प्रत घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे verification.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून, स्वतः किंवा शाळांमार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती आणि सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत.

विदयार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 20 जून ते 29 जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी 20 जूनपासून 9 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. तसेच जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

10 th Result : शुक्रवारी दुपारी ऑनलाइन ( Online ) जाहीर होणार
10 th Result : शुक्रवारी दुपारी ऑनलाइन ( Online ) जाहीर होणार