Verification: 4e7838d05962b884

बिटकॉइन (Bitcoin)चे संस्थापक सातोशी नाकामोतो (Satoshi Nakamoto) यांच्या पुतळ्याचे अनावरण

Spread the love

16 सप्टेंबर 2021 रोजी हंगरीने बिटकॉइनचे संस्थापक सतोशी नाकामोतो (Satoshi Nakamoto) यांच्या पुतळ्याचे अनावरण

बिटकॉइन (Bitcoin)चे संस्थापक सातोशी नाकामोतो (Satoshi Nakamoto) यांच्या पुतळ्याचे अनावरण
सातोशी नाकामोतो

भव्य अशा कांस्यमुर्तीचे अनावरण हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे करण्यात आले आहे. बिटकॉइन या डिजिटल चलनाची निर्मीती करणाऱ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, ही जगातील पहिली मूर्ती बनविण्यात आली आहे. याचे ठिकाण बुडापेस्टमधील डॅन्यूब नदीजवळील, बिझनेस पार्कमध्ये आहे.

मूर्तीची वैशिष्ट्ये | Features of the statue –

या मूर्तीला एक वैशिष्ट्यपुर्ण चेहरा आहे, तो कांस्य धातुंच्या हुडीमध्ये बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये बिटकॉइन लोगो आहे. मूर्तीला मोठया प्रमाणात पॉलिश करण्यात आले आहे. येथे प्रेक्षक स्वतःला पुतळ्यात पाहू शकतात. इतकी चमक त्यामध्ये आहे.

शिल्पकार निर्माता | Craftsman Manufacturer –

मुर्तीकार रेखा जर्जेली आणि तामस गिली यांनी हा पुतळा उभारला आहे. त्यांनी याचे मानवी रूप साकारले आहे.

बिटकॉईन | (Bitcoin)-

सन 2008 मध्ये बिटकॉइनची निर्मिती झाली. पीअर-टू-पीअर ऑनलाइन व्यवहारासाठी सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करून पारंपारिक वित्तीय संस्थांना बायपास करण्याचे उद्दिष्ट होते. यात बँकांसारख्या मध्यस्थांचा समावेश नाही.

नाकामोटो | Nakamoto –

नाकामोतो हे एक टोपणनाव आहे जे अज्ञात लिंग, वय आणि राष्ट्रीय उत्पत्तीच्या लोकांच्या गट किंवा गटाचा संदर्भ घेऊ शकते.

More News –