Verification: 4e7838d05962b884

श्रीलंकेत इंधन टंचाई | Fuel shortage in Sri Lanka

Spread the love

श्रीलंकेत इंधनाची मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. अशी माहिती ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी दिली.

मागणीच्या तुलनेत केवळ एक दिवस पुरेल इतकेच पेट्रोल उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान देशात यापूर्वीच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांखेरीज इतर वाहनांना पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. शिवाय देशातील शाळा एक आठवडाभर बंद राहणार आहेत.

राजधानी कोलंबोमधे अध्यक्ष गतभय राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या करण्यात येत आहे. त्यासाठी निदर्शनं चालू आहेत.

श्रीलंकेत इंधन टंचाई
Fuel shortage in Sri Lanka