Verification: 4e7838d05962b884

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे आमदारांना पत्र

Spread the love

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज आमदारांना पत्रा लिहिले आहे. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱयांचे आभार मानले आहेत.

या पत्रात ठाकरे म्हणाले, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.